शीतलटाईम्स - महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार  शीतलटाईम्स। अहमदनगर प्रतिनि

महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार 

शीतलटाईम्स। अहमदनगर प्रतिनिधी 

शीतल टाईम्स । अहमदनगर  प्रतिनिधी

नगर-येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून ऍक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने माळीवाडा येथे  आदर्श पत्रकार पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले.
 

यावेळी  महापौर रोहिणी शेंडगे, मनीष साठे, पोपटराव साठे, मधुकर रावजी पठारे साहेबराव पाचरणे, विजय वडागळे, ना.म.साठे, नामदेव चांदणे, जालिंदर उल्हारे, ऍक्टिव्ह मराठीचे संचालक उमेश साठे व जालिंदर उल्हारे झआदीं मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महेश कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता करत असून त्याना दा प आपटे पत्रकारिता पुरस्कार, पुणे महानगरपालिका, दै सामना, दै लोकसत्ता, संकेत अकॅडमी पुणे, यांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच, ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य असून जागतिक साळी फाऊंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. प्रतिबिब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी, हिंदी, इंग्र्रजी दैनिकात प्रकाशित झाले असून, अहमदनगर प्रेस फोटोग्राफर्स असो दरवर्षी फोटो प्रदर्शन मध्ये त्याचे फोटो सहभागी असत, त्यांनी आचार्य आनंदऋषी महानिर्वाणचे तसेच फोटो प्रदर्शन व फोटो क्लबच्या वतीने नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवले होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री कांबळे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. 



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव