शीतलटाईम्स - 'माउली'ने केलेले अनंत उपकार सर्वक्षेष्ठच होय = प्रा. नंदकिशोर कुऱ्हे माऊली वृद्धाश्रमास केली भरीव मदत शीतलटाईम्स । शिरसगाव (प्रतिनिधी)
'माउली'ने केलेले अनंत उपकार सर्वक्षेष्ठच होय = प्रा. नंदकिशोर कुऱ्हे
माऊली वृद्धाश्रमास केली भरीव मदत
शीतलटाईम्स । शिरसगाव (प्रतिनिधी)
'माउली' ने केलेले अनंत उपकार हे सर्वक्षेष्ठ असतात. म्हणूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'असं म्हटलंय, आमची आई स्व.सौ.पार्वतीबाई जिजाबा कुऱ्हे ह्यांच्यामुळेच आम्हाला सुसंस्कार व संपन्नता मिळाली! असे भावपूर्ण उदगार माजी प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांनी व्यक्त काढले.
प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांनी आपली आई स्व.सौ.पार्वतीबाई कुऱ्हे यांच्या 29 व्या स्मृतीनिमित्त येथील माऊली वृद्धाश्रमास स्नेहभोजन, 20खुर्च्या 20 छत्र्या, फ्रिज आणि उपयुक्त वस्तू देणगी म्हणून दिल्या. याप्रसंगी प्रा. कुऱ्हे बोलत होते. प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी गेल्या चार वर्षांपासून हा वृद्धाश्रम सर्वांच्या योगदानातून आकाराला येत आहे, प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी गेल्या चार वर्षांपासून मोठे योगदान दिले आहे. असा आदर्श समोर ठेऊन आता "देतो देव" स्वरूपाच्या दात्यांनी वृद्धाश्रम बांधकामासाठी देणगी दिली तर हे मानवसेवेचे कार्य सावलीत येईल. देणगीदाराचे नाव प्रत्येक खोलीला देण्यात येईल असे सांगून प्रा. कुऱ्हे यांनी आईची थोरवी दानधर्मातून वाढविली म्हणून त्यांचा सन्मान केला.
यावेळी उज्ज्वलाताई गोरे, जयश्री श्रीवास्तव, दादासाहेब कातकडे, महादेव हरड, रमाकांत क्षीरसागर, संतोष भालेराव, सुरेश सोनवणे, शुभम नाणेकर, लक्ष्मीबाई गायकवाड, ताराबाई अग्रवाल, इंदुबाई सोनवणे, तुकाराम मोरे, लताबाई साळुंके, बजरंग दौन्डे आदी उपस्थित होते. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सौ.कल्पनाताई वाघुंडे आणि सुभाष वाघुंडे यांनी आपले सर्वस्व देऊन हा वृद्धाश्रम सुरु ठेवला आहे. त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि वृद्धांना खोली बांधकाम सुरु केले याविषयी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बाबूराव उपाध्ये यांनी केले तर उज्ज्वलाताई गोरे यांनी स्व.सौ.विजयाताई कुऱ्हे यांच्या आठवणी सांगत प्रा.कुऱ्हे यांनी आईचं आणि पत्नीचं खरं स्मारक देणगीतून उभारले असे सांगत सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा