शीतलटाईम्स - श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाला चेतन जाधव, पुरूषोत्तम भराटे यांची आर्थिक मदत अनाथ आश्रमातील मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची - शरद नवले शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)

श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाला चेतन जाधव, पुरूषोत्तम भराटे यांची आर्थिक मदत

अनाथ आश्रमातील मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची - शरद नवले

शीतलटाईम्स । बेलापुर  (प्रतिनिधी)

श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची असुन या आश्रमातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी दिली.

महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मिळालेला बोनस गरीबांना मदत म्हणून  देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांना मिळालेल्या बोनसचे चार हजार रुपये तसेच तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी दिलेल्या मदतीनिधी सह एक्कावनशे रूपये श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद  नवले म्हणाले की या ठिकाणी आश्रमास पत्र्याचे शेड बांधुन देण्याची मागणी असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तसेच, येथील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु. 

या आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांचे वय अवघे १९ वर्ष असतानाही ते १४ अनाथ मुलाचा सांभाळ करत आहे ते स्वतः अनाथ असुनही अनाथाचा ते नाथ बनले आहे असेही ते म्हणाले या वेळी कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या आश्रमात चौदा अनाथ मुले राहत असुन त्याचा दैनंदिन व शिक्षणाचा खर्च मोठा आहे या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे त्या करीता दानशुरांनी या आश्रमास मदत करावी असे अवाहन कृष्णानंद महाराजांनी केले आहे या वेळी पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चेतन जाधव पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार, किशोर कदम, प्रकाश मेहेत्रे उपस्थित होते.




****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव