शीतलटाईम्स - सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बेलापुरात श्रद्धांजली ! शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बेलापुरात श्रद्धांजली !
शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत, त्यांची धर्मपत्नी मधुलिका रावत व इतर अकरा लष्करी जवानांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. बेलापुरातही ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
येथील विजयस्तंभाजवळ सीडीएस जनरल बिपिन रावत यांचेसह सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी " अमर रहे! अमर रहे! बिपिन रावत अमर रहे! " अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई आदिंनी श्रद्धांजलीपर शब्दसुमन वाहिले.
यावेळी माजी पोलीस पाटील शिवाजी वाबळे, पोलिस नाईक गणेश भिंगारदे, पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, शकील शेख, गणेश आढाव, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष कुऱ्हे, भास्कर बंगाळ, गणेश बंगाळ, शफीक आतार बाबा शेख, बापू कुऱ्हे बाळासाहेब लगे, नामदेव दुधाळ, डॉ. रविंद्र गंगवाल, अन्वर सय्यद, शफिक शेख, रावसाहेब अमोलिक, मच्छिंद्र खोसे, बाळासाहेब निकम, मोहन सोमाणी, संजय गोरे, महेश ओहोळ आदी उपस्थित होते.
****************************************************
****************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
****************************************************
****************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा