शीतलटाईम्स - कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य निवडून दिल्याचे समाधान - माजी सभापती अरुण ठाणगे सुप्रिया अमोल साळवे यांच्या पंचायत समिती निधीतून तिखोल येथे विकासकामांचे भूमिपूजन शीतलटाईम्स । पारनेर प्रतिनिधी

कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य निवडून दिल्याचे समाधान - माजी सभापती अरुण ठाणगे 

सुप्रिया अमोल साळवे यांच्या पंचायत समिती निधीतून तिखोल येथे  विकासकामांचे भूमिपूजन

शीतलटाईम्स । पारनेर प्रतिनिधी

पारनेर पंचायत समितीच्या टाकळी ढोकेश्वर गणाच्या पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रियाताई अमोल साळवे यांच्या रुपाने टाकळी ढोकेश्वर गणाला काम करणारा सदस्य निवडून दिला. याचे सदैव समाधान राहील असे मनोगत पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक अरुणराव ठाणगे पाटील यांनी तिखोल येथे व्यक्त केले.  

तिखोल येथे सौ.सुप्रियाताई अमोल साळवे यांच्या प्रयत्नातुन सोनारी वस्ती रस्त्याच्या मुरुमीकरण व दुरुस्तीचा शुभारंभ  कार्यक्रम नुकताच पार पडला त्या वेळी अरुण ठाणगे बोलत होते. सौ.सुप्रियाताई साळवे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून तिखोल गावात केलेल्या मळगंगा माता मंदिर प्रांगणास पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रिट लाईट, वैयक्तिक लाभाच्या योजना, बैठक बाकडे या कामासाठी अरुण ठाणगे यांनी त्यांचे गावाच्या वतिने आभार मानले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती अरुण ठाणगे, अमोल, साळवे सर, मोहनराव रोकडे, माजी चेअरमन नागचंद ठाणगे, माजी सरपंच सुभाष ठाणगे, नबाजी मंचरे, आप्पा ठाणगे, आनंदा ठाणगे, शिवाजी नाना ठाणगे, सोनु मंचरे, महेश ठाणगे, शिवाजी (पपू)ठाणगे, योगेश ठाणगे, लक्ष्मण ठाणगे, भानुदास ठाणगे, बाळासाहेब ठाणगे, रामदास ठाणगे, बाळासाहेब मंचरे(गुरूजी), सुहास ठाणगे, वैभव ठाणगे, प्रतिक ठाणगे, मालुजी मंचरे (गुरूजी), ग्रामपंचायत सदस्य राजू ठाणगे, समाधान ठाणगे, राहुल ठाणगे, विजय ठाणगे, किरण धरम, विजय ठाणगे अमोल मंचरे, पिनू मंचरे, पोपट मंचरे, दत्ता ठाणगे, अक्षय ठाणगे, रावसाहेब मंचरे, योगेश तांबडे, सखाराम मंचरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव