शीतलटाईम्स - गळनिंब येथे भरदिवसा चोरी! सोने, चांदीसह रोख रक्कम लांबविली! शीतलटाईम्स । गळनिंब प्रतिनिधी
गळनिंब येथे भरदिवसा चोरी!
सोने, चांदीसह रोख रक्कम लांबविली!
शीतलटाईम्स । गळनिंब प्रतिनिधी
श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब येथे भरदिवसा दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान कोल्हार बेलापूर रोडवरील गावाजवळ असणार्या बंगल्यात चोरी झाली असून सोने, चांदिसह रोख रक्कम लांबविल्याची घटना घडली.गळनिंब येथील श्रीकांत संजय भोसले यांच्या बंगल्यासमोर ३ ते ४ च्या दरम्यान गेटसमोर एक कार उभी करून गेटच्या आत एकाने प्रवेश करत श्रीकांत यांचे वडिल पोर्च मध्ये बसले असताना त्यांना विचारले की सरांनी आम्हाला प्लबिंगचे काम पाहण्यास सांगितले तुमची पाण्याची टाकी कुठे आहे. असे म्हणून आमचे गावात काम चालू आहे आम्ही जाधव आहे असे सांगितले असता वडिलांचे वय व दिसण्यास कमी असल्याने जिन्यावरून चढत वरती गच्चीवर पाण्याची टाक्या दाखवत वडिलांना नादी लावल्यानंतर उर्वरीत दोन इसम कारमधून उतरत घराच्या बेडरूम मध्ये प्रवेश करत कपाटे उचकून सोनं, चांदीसह रोख रक्कम लांबविली ही बाब संजय भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर शेजारी पाजारी सांगितले तोपर्यंत चोरटे बेलापूर च्या दिशेने गेल्याचे कळले.
दरम्यान श्रीकांत भोसले हे श्रीरामपूर येथील हिरो शोरूम मध्ये नोकरीस असल्याने व पत्नी प्रवरा मेडीकर ट्रस्ट लोणी याठीकाणी नोकरीस असल्याने दिवसभर घरी वृध्द वडिल व दोन लहान मुलेच असल्याचे चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा