शीतलटाईम्स - बेलापूर महाविद्यालयात जागतिक एड्स दिन संपन्न शीतलटाईम्स । बेलापूर (प्रतिनिधी)
बेलापूर महाविद्यालयात जागतिक एड्स दिन संपन्न
शीतलटाईम्स । बेलापूर (प्रतिनिधी)
येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 'एड्स समज व गैरसमज' या विषयावर श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत करपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी एड्स या आजाराबाबत असलेली सद्यस्थिती, व मार्गदर्शन करतांना, एइसबाबतची भीती याचे सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या.
यावेळी महाराष्ट्र पोलिस सेवेत प्रविष्ट झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आरती खर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर, प्रा.रुपाली उंडे, श्रीरामपूर तालुका जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ पुरुषोत्तम शिंदे, प्रा.डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक माने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.रुपाली उंडे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा