शीतलटाईम्स । महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारावर गुन्हा दाखल करावा- मनसे शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारावर गुन्हा दाखल करावा- मनसे

शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)

कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई  करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे.

मनसेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नाही तर ते भारत वासीयांचे श्रध्दास्थान आहे या घटनेमुळे सर्व देश वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राहता तालुक्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव येथील चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रीरामपुर च्या वतीने निवेदन देण्यात आले.

या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, गणेश दिवसे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे  शहराध्यक्ष, विशाल शिरसाठ , सचिन सरोदे, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी शहराध्यक्ष  संतोष डहाळे तालुका सरचिटणीस, ईश्वर जगताप, शहर सचिव अमोल साबणे उपाध्यक्ष अरुण बुऱ्हाडे  आदि पदाधिकारी उपस्थित होते.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव