शीतलटाईम्स - सदाशिव थोरात यांच्या वतीने गरजूंना उबदार कपडे व दैनंदिन वापराच्या वस्त्रांचे वाटप शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)
सदाशिव थोरात यांच्या वतीने गरजूंना उबदार कपडे व दैनंदिन वापराच्या वस्त्रांचे वाटप
शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सुखदेव थोरात यांनी पुणे येथुन एक टेम्पो भरुन कपडे आणून ते सर्व श्रीरामपुर बेलापुर उक्कलगाव येथील गरजुंना विविध मान्यवरांच्या हस्ते वाटप केले असुन त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदाशिव थोरात हे पुणे येथील सिंहगड टेक्निकल ऐज्यूकेशन सोसायटी वडगाव गुप्ता येथील शिक्षण संस्थेत नोकरी करत आहे ते मुळचे उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील रहीवासी आहेत नोकरी करत असतानाच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली त्यांनी पुणे येथुन आपल्या संपर्कातील अनेकांना मदतीचे अवाहन केले अन त्यांची संकल्पना अनेकांना भावली चांगल्या प्रतीच्या साड्या स्वेटर मफलर ब्लाऊज पँट शर्ट असे एक टेम्पोभर कपडे घेवुन ते श्रीरामपुरात दाखल झाले. ऐकलहरे येथील आठवाडी येथील वसाहतीत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके याच्या उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्ते गुलाबभाई जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा अन्सार जहागीरदार अनिस जहागीरदार अर्जुन मकासरे अनिल कोल्हे सुभाष शिंदेबबन तागड सर यांच्या हस्ते होतकरु कुटुंबाना कपड्याचे वाटप करण्यात आले.
बेलापुर येथील घिसाडी बांधवांना देखील बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमात गादी उशी बेडशिट फ्रीज पंखा आदि सामान भेट म्हणून देण्यात आले विठ्ठल अनाथाश्रम गोखलेवाडी येथील आश्रमास देखील गादी व बेडशिट देण्यात आले अनाथ मुलांच्या वसतीगृहात देखील कपड्यांचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या सदाशिव थोरात यांनी यापूर्वीही उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील भानसगाव येथे अन्नधान्याचे वाटप केले होते कोरोना काळात तमाशा कलावंताना सांगली कराड येथे जावुन २७६ कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले होते सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीला देखील थोरात धावून गेले होते पूरग्रस्तांना धान्याचे व कपड्याचे वाटप करण्यात आले होते सेव द चाईल्ड फौंडेशनच्या माध्यमातून लहान मुलांना उपचारासाठी भरीव अशी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली होती अशा या सामाजिक कार्यकर्त्याचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा