शीतलटाईम्स - बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिलेला धमक्या धमकावणार्‍यावर कारवाई करण्याची पिडीत महिलेची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिलेला धमक्या

धमकावणार्‍यावर कारवाई करण्याची पिडीत महिलेची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबीयांना त्रास देणार्‍या मोहसीन शेख व इतर दोन महिलांविरोधात कारवाई करण्याचा तक्रार अर्ज मुकुंदनगर येथील पिडीत विधवा महिलेने पोलीस अधीक्षकांना दिला. पिडीत विधवा महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये साजिद अब्दुललतीफ शेख उर्फ लाला याच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्हा न्यायालयात जबाब देण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी गेले असता, घरी परतताना मोहसीन शेख (रा. अलमगीर) याने चार चाकी गाडी उभी करुन माझी आई व मला पैसे घेऊन गुन्हा मागे घेण्याचे सांगितले. अन्यथा तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर बोल्हेगाव येथे कामावर असलेल्या भावाला देखील मारण्यासंबंधी धमकावले आहे. या प्रकरणात मोहसीन शेख, शाहीन शेख, मड्डो शेख साजिद शेख उर्फ लाला यांच्याकडून कुटुंबीयांना धोका असल्याचे पिडीत महिलेने तक्रार अर्जात म्हंटले आहे. तर गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव