शीतलटाईम्स - आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत द्यावी - रणजीत श्रीगोड शीतलटाईम्स। श्रीरामपूर प्रतिनिधी
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत द्यावी - रणजीत श्रीगोड
शीतलटाईम्स। श्रीरामपूर प्रतिनिधी
अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एस. टी. च्या ज्या कर्मचा-यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबियांना २० लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या एस. टी. संपाचे काळात राज्यातील ४२ एस टी कर्मचा-यांनी आत्महत्या केली असून त्यांचा परिवार उद्धस्त झाला आहे हा संप एस टी च्या इतिहासात मोठा संप असून प्रथमच प्रवाशांना पहावयास मिळाला आहे. कर्मचा-यांना आत्महत्या करावी लागली ही दुर्दैवी घटना आहे.
राज्य शासनाने एखादे प्रवाशाला प्रवास करताना अपघात झाल्यास मृत्यू झाल्यास त्याचे कुटूबाना १० लाख रुपये देण्याची तरतुद करण्यासाठी अपघात सहाय्यता निधी योजनेची स्थापना करून विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले. या योजनेत निधी जमा करण्यासाठी प्रवासी जनतेकडून दर प्रवासातील तिकीटामागे एक रुपया विशेष निधी वसुल करण्यात येत आहे. त्या जमा होणा-या निधीतून मृत व्यक्तीचे कुटूंबाला १० लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात येते. हा पैसा जनतेचा असून त्यामुळे या निधीतून विशेष बाब म्हणून विश्वस्त मंडळाचे सभेत ठराव करून त्या ४२ एस टी कर्मचा-यांना कुटूंबातील उदरनिर्वाह व पाल्याची शिक्षणाची व्यवस्था होण्यास प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात यावी अशी सुचना प्रवासी महासंघाचे महासचिव नंदकुमार कोरे (पुणे) व सचिव गुरुनाथ बहिरट (पंढरपूर) यांनी परिवहन मंत्री ना. अनिल परब व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चत्रे यांचेकडे केली असून अपघात सहाय्यता निधी योजनेत ४०० कोटीपेक्षा जास्त निधी जमा असल्याने तातडीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतल्यास या निधीचा विनियोग सत्कार्णी लागेल असे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी
****************************************************
****************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
****************************************************
****************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा