शीतलटाईम्स - बेलापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
बेलापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
"ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल, त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे." असे सांगत "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा!" हा मंत्र देणारे भारतीय राज्य घटणेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेलापूर येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी बेलापूर ग्रामपंचायत, बेलापूर वि.वि.कार्यकारी सोसायटी, बेलापूर महाविद्यालय व रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाच्या बेलापूर शाखेच्या वतीने महामानवाच्या प्रतिमेस विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बेलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, जनता विकास आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, पत्रकार विष्णूपंत डावरे, देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, ग्रामपंचायत सदस्य आबा नवले, रमेश अमोलिक, सागर खरात, दिलीप अमोलिक, माजी उपसरपंच प्रकाश नाईक, भास्कर बंगाळ, दत्तात्रय वाबळे, गोरक्षनाथ कु-हे, अनिल मेहेत्रे, विजय खंडागळे, निलेश सोनवणे, रफिक शेख, प्रफुल्ल डावरे, सुरेश अमोलिक, विश्वास अमोलिक, मोहसीन सय्यद, जिना शेख, प्रल्हाद अमोलिक आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा