शीतलटाईम्स - कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना लावल्या शिवछत्रपतिंच्या प्रतिमा शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा आरपीआय कडून निषेध शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना लावल्या शिवछत्रपतिंच्या प्रतिमा

शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा आरपीआय कडून निषेध

शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरू जवळ झालेल्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निषेध नोंदवून, अहमदनगर जिल्ह्यातून कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लाऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला.

केडगाव बाह्यवळण रस्ता येथे झालेल्या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, आयटी सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका संघटक महेंद्र मोहिते, युवक शहर उपाध्यक्ष सनी माघाडे, विक्रम चव्हाण आदी सहभागी झाले होते.

आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना निषेधार्ह असून, महापुरुषांची विटंबना करणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशा विटंबनेच्या घटनांमधून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांचा उद्देश असून, यामधील आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळुरू जवळ झालेल्या विटंबनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निषेध नोंदवून, अहमदनगर जिल्ह्यातून कर्नाटकला जाणार्‍या वाहनांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमा लाऊन महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, आयटी सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका संघटक महेंद्र मोहिते, युवक शहर उपाध्यक्ष सनी माघाडे, विक्रम चव्हाण आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)


****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव