शीतलटाईम्स ।- जात, वर्ण द्वेषाने छळलेल्या समाजाच्या क्षितीजावर बाबासाहेबांच्या रुपाने क्रांतिसुर्याचा उदय झाला - सुनिल साळवे आरपीआयच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)
जात, वर्ण द्वेषाने छळलेल्या समाजाच्या क्षितीजावर बाबासाहेबांच्या रुपाने क्रांतिसुर्याचा उदय झाला - सुनिल साळवे
आरपीआयच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)
गुलामगिरीचं जीवन जगणार्या पददलित, शोषित वर्गामध्ये बळ निर्माण करण्याचे कार्य केले. दीन-दुबळ्यांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. गुलामगिरीत असलेल्या व जात, वर्ण द्वेषाने छळलेल्या समाजाच्या क्षितीजावर क्रांतिसुर्याचा बाबासाहेबांच्या रुपाने उदय झाला. समाजातील जातिभेद व वर्णव्यवस्थे विरोधात लढा देऊन क्रांती घडविल्याचे आज सशक्त भारताचे स्वप्न साकारले गेले. आधुनिक भारताच्या इतिहसात बाबासाहेबांचे स्थान अढळ असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष साळवे बोलत होते. अभिवादनसाठी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर सपर्क प्रमुख संजय कांबळे, नगरसेवक राहुल कांबळे, महेंद्र राजगुरु, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शहर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, जामखेड तालुकाध्यक्ष सतिष साळवे, सिध्दांत दाभाडे, रमेश आखाडे, मदन ढवळे, नितीन साळवे, दीपक पाडळे, प्रदिप कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा