शीतलटाईम्स - बाळासाहेब सालके यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड शीतलटाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

बाळासाहेब सालके यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड 

शीतलटाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महामंडळ सभा दि. २४ ऑक्टोबर रोजी राज्याचे नेते संभाजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्याचे नूतन पदाधिकारी निवडी सदर सभेत घोषित करण्यात आल्या. राज्य कार्यकारी मंडळ सभा नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. महामंडळ सभेत अस्थायी व प्रभारी पदभार असणारी पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद प्रभारी असल्याने त्याबाबत कार्यकारी मंडळ सभेने निर्णय घेऊन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दत्तात्रय सालके सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडगाव, तालुका पारनेर यांच्या निवडी बाबत अधिकृत पत्र देऊन घोषणा करण्यात आली.  सालके शिक्षक संघाचे अभ्यासू व  निष्ठावंत पाईक आहेत. स्वर्गीय कै. भा. दा. पाटील यांच्या मुशीत बाळासाहेब सालके सर यांनी संघ कार्याचा श्री गणेशा केला. संघ वाढीसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या निवडीने संघात प्रमाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांला संधी मिळाल्याची भावना संघप्रेमित आहे.

संघात त्याच्या निवडीने उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षक संघाच्या ध्येय धोरणांची बांधिलकी नगर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी सातत्यानं जपली आहे.  सालके यांनी तत्काळ सर्व तालुका संघाच्या कार्यकारणीची पुनर्रचना करावी त्याबाबतचा अहवाल राज्य संघाला द्यावा असे राज्य संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी सूचित केले. राज्य संघ सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी नवीन सभासद नोंदणी शिक्षक व शिक्षकांचे प्रश्न  संघटनात्मक चळवळ गतिमान करणे इत्यादी बाबी सांगितल्या. कार्यकारी मंडळ सभेस शिक्षकांचे मार्गदर्शक नेते संभाजी थोरात राज्य संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे सर कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे सर कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी सर राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप सर, राज्य कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ सर यांच्या स्वाक्षरीने नूतन अध्यक्ष अहमदनगर बाळासाहेब सालके सर यांना अहमदनगर जिल्हा  प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी निवडीचे पत्र  राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष एन. वाय .पाटील सर , राष्टीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे सर,  यांच्या मान्यतेने देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महासंघ संघटक रावसाहेब सुंबे सर, राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे सर , राज्य महिला आघाडी अध्यक्षा स्वाती शिंदे, मुख्याध्यापक संघाचे नेते अरुण आवारी  सर यांची उपस्थिती होती.

नगर जिल्हा पदाधिकारी निवडी बाबतचे अधिकार राज्य सरचिटणीस  आबासाहेब जगताप सर, राष्ट्रीय संघटक रावसाहेब सुंबे सर, राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे सर, नूतन अध्यक्ष बाळासाहेब सालके सर यांना देण्यात आले आहेत. याप्रसंगी उपस्थित पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ झावरे सर, संगितकुमार डोळ, प्रवीण पटेकर, नितीन कोळसे, अनिल अरांगळे, अमोल साळवे  सर , बाळासाहेब देंडगे, अंबादास गारुडकर सर, विशाल खरमाळे, मधूकर शिंदे, दत्तात्रय रोकडे , विजय लंके सर, नागेश लगड, किशन बोरुडे, पोपटराव कदम सर, लहुजी थोरात सर , राजेश साबळे सर, ललित मोरे सर , वैभव ठाणगे सर, सुभाष आमले सर,शिवाजी ठोकळ सर,कृष्ण मुरारी गाडे सर, संगीता कुरकुटे मॅडम, बाळासाहेब रोहकले सर, चंद्रकांत गोसावी सर, यांच्या सह मोठ्या संख्येने संघप्रेमी  यावेळी उपस्थित होते.
****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव