शीतलटाईम्स - महाराष्ट्र बँकेचे रोखपाल दत्तात्रय काशीद यांचा सेवापुर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न शीतलटाईम्स । श्रीरामपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र बँकेचे रोखपाल दत्तात्रय काशीद यांचा सेवापुर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न
शीतलटाईम्स । श्रीरामपुर प्रतिनिधी
आपण गेले पस्तीस वर्षे महाराष्ट्र बँकेत नोकरी नाही तर स्वतःचा व्यवसाय समजून सेवा केली. नोकरीचा अंतिम टप्पा बेलापूरात पार करता आला. या काळात आपल्याकडे ग्राहकांना नजरचुकीने काहीवेळा पैसेही जास्त गेले मात्र, त्यानी ते प्रामाणिकपणे परत आणून दिले. बेलापूरकरांइतका प्रामाणिकपणा इतरत्र मिळाला नसल्याचे प्रतिपादन दत्तात्रय काशीद यांनी केले आहे.
दत्तात्रेय काशीद हे नुकतेच महाराष्ट्र बँकेतून बेलापूर येथून सेवा निवृत्त झाले. चैतन्य योगा प्रतिष्ठान, ग्राहक श्रीरामपुर बेलापूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रवासी संघटनेचे अध्यक्षस्थानी रणजीत श्रीगोड हे होते. व्यासपीठावर अनील कुलकर्णी, प्रा. डॉ. गोरख बाराहाते, डॉ. गजानन काशीद, प्रकाश नहर, घनशाम साळुंके, संजय बावके, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापूरचे शाखाधिकारी अजय बोरसे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना काशीद म्हणाले, आपण महाराष्ट्र बँकेत बँकेच्या नियमानुसार रोखपाल म्हणून सेवा केली. एका नामांकित बँकेत सेवा करण्याची संधी आपणास मिळाली हे आपले भाग्यच आहे. कधी कधी ग्राहकांना पैसे जास्त गेले मात्र, त्यांनी ते प्रामाणिकपणे वापस दिले. कधी ग्राहकांचे पैसे जास्त आले तेही आपण प्रामाणिकपणे परत केले. आपल्याला प्रामाणिकपणाचा फायदाही झाला. वर्तमानपत्रात प्रामाणिकपणाबद्दलच्या बातम्याही छापून आल्या. सूत्रसंचालन आदिनाथ जोशी यांनी केले तर, आभार रमेश चंदन यांनी माणले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा