शीतलटाईम्स - प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन शेकटकर यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)


प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

शेकटकर यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर

शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाजाचा 21 व्या मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सावेडी, भिस्तबाग रोड येथील सोनापार्कमध्ये हा मेळावा संपन्न होणार असून, या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

तर समाज बांधवांचे प्रश्‍न निस्वार्थ भावनेने सोडविण्यासाठी योगदान देणारे समाजाचे नेते अनिल शेकटकर यांना संस्थेच्या वतीने प्रथम समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रोहिणीताई शेंडगे उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना नुकतेच देण्यात आले. कल्पनाताई शरद काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास नगर अर्बन बँकेचे संचालक मनेष दशरथ साठे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील मातंग समाज मोठ्या प्रमाणात नोकरी उद्योग धंदे- व्यवसाय व इतर कारणाने ग्रामीण भागातून शहरात आले असल्याने समाज विखुरला गेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाज एकवटणार असून, वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींचे लग्न जमविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. योग्य व अनुरूप असा जोडीदार निवडण्यासाठी संस्थेच्या वतीने वधु वर परिचय मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जात असून, हे 21 वा मेळावा आहे. यामध्ये मातंग जातीतील हिंदू, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन व इतर धर्मियांचा सहभाग असतो. या मेळाव्यास संपुर्ण राज्यातून मातंग समाजबांधव उपस्थित राहणार असून,

याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष दादू नेटके, सचिव अनिल जगताप यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विजय वडागळे, सुनिल सकट, विनोद सोनवणे, सुनिल पारधे, विठ्ठल उमाप, संस्था मार्गदर्शक भगवान जगताप, संजय मांडलीक, नामदेव रोकडे, भास्कर आडागळे, शरद (अण्णा) काळोखे, विजय वावरे, रवींद्र जगताप, मेजर राजू शिंदे, विजय पाचारणे, रामदास सुलाखे, बाळकृष्ण जगधने, डॉ.सुनिल पवार परिश्रम घेत आहे. मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची फी अथवा शुल्क आकारले जात नसून, या मेळाव्यासाठी जेवणाची व्यवस्था विनोद सोनवणे यांनी केली आहे. मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी दादू नेटके 9272513071 व अनिल जगताप 9922714353 यांन संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाजाचा 21 व्या मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण महापौर रोहिणीताई शेंडगे यांना देताना अध्यक्ष दादू नेटके, सचिव अनिल जगताप, विजय वडागळे, सुनिल सकट, विनोद सोनवणे, सुनिल पारधे, विठ्ठल उमाप, संस्था मार्गदर्शक भगवान जगताप, संजय मांडलीक, नामदेव रोकडे, भास्कर आडागळे, शरद (अण्णा) काळोखे आदी.


****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव