शीतल टाईम्स // भंडारदरा धरणातून 1000 क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी

संग्रहीत छाया चित्र 

डारदरा धरणातून 1000 क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) — भंडारदरा धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आज, दिनांक 3 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता भंडारदरा धरणातून 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

धरणातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विसर्गाची टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

यामुळे प्रवरा नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधारा खालील भाग तसेच राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना व वस्तीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील जनावरं, साहित्य किंवा कोणत्याही वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावध राहावे, अनावश्यकपणे नदीपात्रात जाऊ नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या विविध यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या संदर्भातील पत्रकावर कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर पाटबंधारे विभाग यांची सही असून, विभागीय आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांना याची माहिती दिली आहे. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, अहिल्यानगर यांना पत्रक प्रसिध्दीसाठी पाठवण्यात आले आहे.

पावसाळ्यातील वाढती पाण्याची आवक लक्षात घेता, पुढील काही दिवस पाण्याच्या विसर्गामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


✍️ : शीतल टाईम्स प्रतिनिधी




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव