शीतल टाईम्स // दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोफत वाटप शिबिर; 11 जुलै रोजी श्रीरामपूर येथे आयोजन
शीतल टाईम्स प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोफत वाटप शिबिर; 11 जुलै रोजी श्रीरामपूर येथे आयोजन
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंको) कानपूर, एस.आर. ट्रस्ट, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर, मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शुक्रवार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता मूकबधिर विद्यालय, गायत्री मंदिराजवळ, अशोक टॉकीजसमोर, बेलापूर रोड, श्रीरामपूर येथे होणार आहे. याबाबत माहिती वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे व मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी दिली आहे.
या शिबिरात अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना तात्काळ मोजमाप घेऊन मोफत कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स वाटप करण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिराचे आयोजन डॉ. सुजय विखे (अध्यक्ष, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र) यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात असून, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, प्रकल्प समन्वयक डॉ. दीपक अनाप, रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश पा. बनकर, सचिव नारायणभाई पटेल, खजिनदार विनोद पाटणी, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी, वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सुनील कानडे, खजिनदार संसाधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
अस्थिव्यंग प्रवर्गातील गरजू दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा