शीतल टाईम्स // बनावट देशी भिंगरी संत्रा दारुचा कारखाना उद्ध्वस्त; ₹1.66 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी

बनावट देशी भिंगरी संत्रा दारुचा कारखाना उद्ध्वस्त; 

₹1.66 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक


श्रीरामपूर (प्रतिनिधी) — श्रीरामपूर शहर पोलिसांच्या विशेष कारवाईत कदम वस्ती, भैरवनाथ नगर येथे सुरु असलेला बनावट देशी भिंगरी संत्रा दारुचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹1,66,320 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.

दिनांक 2 जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त माहिती मिळाली की लता महादु राऊत यांच्या मालकीच्या घरात बनावट देशी भिंगरी संत्रा दारू तयार केली जात आहे. सदर माहितीच्या आधारे पंचासह छापा टाकण्यात आला असता, आरोपी मोसीन इक्बाल सय्यद (24), अरबाज अनिस मलंग (25) आणि अन्वर शब्बीर शहा (47) हे बनावट दारू तयार करताना आणि बाटल्या पॅक करताना आढळले. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

या ठिकाणाहून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:

₹20,230 किमतीच्या 289 बनावट देशी दारूच्या सिलबंद बाटल्या (180 मिली प्रत्येकी ₹70)

₹70,000 किमतीची होंडा अ‍ॅक्टीवा मोपेड (MH-41 AJ-7340), वाहतुकीसाठी वापरण्यात येत होती

₹50,000 किमतीचे स्पिरीट व तयार रसायन, जे जागीच नष्ट करण्यात आले

₹26,090 किमतीच्या रिकाम्या बाटल्या, झाकण, लेबल्स, पॅकिंग साहित्य, मशिनरी व इतर साहित्य


सदर आरोपींनी बनावट दारूसाठी लागणारे स्पिरीट आरोपी प्रमोद व राहुल फुलारे यांच्याकडून घेतल्याचे, तसेच झाकण शिर्डी येथून आरोपी महेश गौड ऊर्फ आण्णा यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. या घराचे मालक लता महादु राऊत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सदर प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 644/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 318(4), 338 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65(ई), (ड), 80, 81, 98, 104 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.उपनिरीक्षक समाधान सोळंके, रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोहेका दादासाहेब लोंढे, पोकों संपत बडे, पोकों अमोल पडोळे, पोकों संभाजी खरात, पोकों मच्छिंद्र कातखडे, पोकों अजित पटारे, पोकों आजिनाथ आंधळे, पोकों अकबर पठाण, पोकों सांगर बनसोडे, पोकों राहुल पौळ, चापोकों बाळासाहेब गिरी, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयांचे पोहेकॉ सचिन धनाड तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस.एस. हांडे. दुय्यम निरीक्षक वाय.बी. पाटील, सह्याक दुय्यम निरीक्षक एस.एस. गारळे, जवान यु.जी. काळे, जवान अमीन सय्यद, जवान नि.वा.चा. एस.एस. कासुळे, महिला जवान प्रमीला कासार यांनी केली असुन यात पोलीस कर्मचारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत.


---

शीतल टाईम्स
(संपर्कासाठी: शीतलटाईम्स.कॉम. मो.8485867429 )




*********************************
*********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*********************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव