शीतल टाईम्स // 🗳 श्रीरामपूरमध्ये निवडणूक सज्जता! प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

     

शीतल टाइम्स प्रतिनिधी 

👇


🗳 श्रीरामपूरमध्ये निवडणूक सज्जता! 

प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक


श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत-पाटील यांनी तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, महसूल सहायक उत्तम रासकर, ओम खुपसे, संदीप पाळंदे व नगरपरिषदेचे लिपिक अरुण लांडे उपस्थित होते.

प्रांताधिकारी सावंत-पाटील यांनी सांगितले की, निवडणूक ही लोकशाहीचा पाया आहे, त्यामुळे सर्व पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. मतदान केंद्रांवर गोंधळ टाळण्यासाठी पक्षांनी ‘बूथ लेव्हल एजंट’ची नेमणूक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी आहे. १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच, प्रतिष्ठित मतदार, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सरपंच, वकील, इंजिनियर, दिव्यांग इत्यादींनी आपली नावे मतदार यादीत तपासावीत, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर स्थानिक पक्ष व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. प्रांताधिकारी सावंत-पाटील यांनी तात्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.

----------------–----

🟢 – तहसीलदारांचे आवाहन

> "निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया यशस्वी करूया. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा अनुभव आणि प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडू."

– मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर

-------------------------

🌟  – प्रांत व तहसीलदारांचे कौतुक

> लोकसभा व विधानसभा निवडणुका प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या राम-लक्ष्मण जोडीच्या कुशल नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे पार पडल्या. कोणतीही तक्रार किंवा अनुचित प्रकार न घडल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले.


---

📸 

श्रीरामपूर येथे प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक तयारी बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांचे पदाधिकारी.



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव