शीतल टाईम्स //- बेलापूर खुर्दला मिळणार नवीन महिला सरपंच! गावकऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला!

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर खुर्दला मिळणार नवीन महिला सरपंच! 

गावकऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला!

बेलापूर खुर्द (शीतल टाईम्स प्रतिनिधी) — बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या राजकारणात मागील काही वर्षांपासून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 2021 साली झालेल्या निवडणुकीत सौ. वर्षा प्रवीण महाडिक यांनी बहुमताने विजय मिळवून 9 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, काही कारणांनी त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आणि 22 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

या नाट्यमय घडामोडीनंतर उपसरपंच अ‍ॅड. दीपक राव बारहाते यांनी प्रभारी सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी निधीअभावी अडलेल्या अनेक कामांना स्वतःच्या खर्चातून गती देत, गावकऱ्यांच्या समस्या समजून घेत समाधानाचा मार्ग काढला. त्यांच्या पारदर्शक व तडफदार कारभारामुळे ते अल्पावधीतच 'लोकप्रिय सरपंच' म्हणून ओळखले जाऊ लागले.

यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2025 रोजी सरपंचपद सौ. प्रणाली विनय भगत यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनीही आपल्या कार्यकाळात विविध लोकहिताची कामे करून स्वतःचा ठसा उमठवला. मात्र, त्यांनी नुकताच राजीनामा सादर केल्यामुळे सरपंचपद पुन्हा रिक्त झाले आहे.

सध्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीच्या नव्या सरपंचाची निवड होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. "या खुर्चीवर कोण विराजमान होणार? कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार?" हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर आहे.

गावाच्या विकासाची नवी दिशा ठरवणारे नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून, गावकऱ्यांमध्ये नव्या सरपंचाविषयी चर्चेला उधाण आले आहे.


— शीतल टाईम्स






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव