शीतल टाईम्स //- खंडागळे परिवाराची ‘दृष्टी’ सेवेची शताब्दी : १०० मोतीबिंदू शिबिरे यशस्वी! सेवाभाव आणि सातत्याचे मूर्तिमंत उदाहरण

शीतल टाइम्स प्रतिनिधी



खंडागळे परिवाराची ‘दृष्टी’ सेवेची शताब्दी : १०० मोतीबिंदू शिबिरे यशस्वी!

सेवाभाव आणि सातत्याचे मूर्तिमंत उदाहरण

बेलापूर (प्रतिनिधी):
एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र त्यात सातत्य ठेवणे आणि ते कार्य उत्तरोत्तर वाढवत नेणे हे खूपच कठीण काम असते. खंडागळे परिवाराने हेच सातत्य आपल्या कार्यातून जगासमोर दाखवले आहे.

दिन-दलित, गरीब व गरजू रुग्णांसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या खंडागळे परिवाराने आयोजित केलेल्या मोतीबिंदू शिबिरांनी आता शंभरी पार केली आहे. भागवत प्रतिष्ठान (खंडागळे परिवार)  स्वस्तिक ग्रुप, तसेच के.के.आय (बुधरानी) हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने काळे हॉस्पिटल, गणपती गल्ली, बेलापूर बुद्रुक येथे हे ऐतिहासिक १००वे मोतीबिंदू शिबिर आज 13 जुलै रोजी पार पडत आहे.

१०० मोतीबिंदू शिबिरे पूर्ण करणे ही केवळ एक संख्या नाही, तर ही शेकडो अंधांना नवी दृष्टी देण्याची, हजारो गरजूंना मदतीचा हात देण्याची आणि अनेकांच्या जीवनात ‘प्रकाश’ पेरण्याची निस्वार्थ सेवा आहे.

या शिबिरांमुळे डोळ्यांच्या विकारांनी त्रस्त, विशेषतः मोतीबिंदूमुळे अंधत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे शक्य नसलेल्या अनेकांना या शिबिरांमुळे मोफत किंवा अत्यल्प दरात शस्त्रक्रिया व उपचार मिळाले, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले.

खंडागळे परिवाराने केवळ शिबिरे आयोजित केली नाहीत, तर प्रत्येक शिबिरात रुग्णांच्या निवडीत, तपासणीमध्ये, शस्त्रक्रियेत व नंतरच्या काळजीत अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा देण्याचा त्यांचा ध्यास कायम राहिला आहे.

या १०० शिबिरांचे यश खंडागळे परिवाराच्या निस्वार्थ सेवाभावाचे आणि कामातील निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती, सातत्य आणि सेवा वृत्ती असेल, तर काहीही अशक्य नाही.

त्यांच्या या कार्यामुळे अनेक सेवाभावी संस्था व तरुण कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे.

या अद्वितीय आणि महत्वपूर्ण सेवेसाठी खंडागळे परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
त्यांची ही सेवा अखंड सुरू राहो, आणि त्यांना उत्तम, निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!

सत्यमेव जयते ग्रुप, बेलापूर प्रेस क्लब, तसेच शीतल टाईम्सच्या वतीने खंडागळे परिवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांस हार्दिक शुभेच्छा!







********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव