शीतल टाईम्स //- माहूरगड येथील रेणुका देवी पादुका व शक्ती दंड सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
माहूरगड येथील रेणुका देवी पादुका व शक्ती दंड सोहळा भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न
बेलापूर (वार्ताहर) — देवळाली प्रवरा ते माहूरगड या मार्गावर रेणुका देवी पादुका व शक्ती दंड सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 7 वाजता श्रीरामपूर येथील थत्ते ग्राउंड जवळील नवदुर्गा काच मंदिरातून केशव गुरु दिमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनेक देवीभक्तांच्या उपस्थितीत पादुका प्रस्थान झाले.
यावेळी नवदुर्गा काच मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर माहूरगडकडे प्रस्थान करत मातृतीर्थ पूजन, शक्ती दंड पूजन आणि पादुका पूजन विधी पार पडले. यावेळी सौवाष्ण पूजन व गुरु पाद्यपूजाही करण्यात आली. भाविकांनी पादुका डोक्यावर घेऊन विष्णू कवी मठापर्यंत जयजयकार करत व देवीच्या नाम घोषात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली.
माहूरगड येथील रेणुका माता मंदिरात प्रदीप नवले सर, त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रेरणा नवले, समीर हांडे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पादुकांना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.
केशव गुरु यांनी आपल्या प्रवचनातून कुलस्वामिनी सेवा, मातृ-पितृ सेवा आणि गुरु महत्त्व याविषयी भक्तांना मार्गदर्शन केले. गुरुमाऊली सौ मोहिनी दिमोटे, शिंदे ताई आणि स्वयं केशव गुरु यांनी भळंद गोंधळ सादर केला. यावेळी उपस्थित भाविकांनी देवी भक्तिगीतांच्या तालावर नृत्य, फुगडी आणि गोंधळ सत्रात सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला.
कार्यक्रमात सहभागी भाविकांच्या नावाच्या चिठ्ठ्यांमधून भाग्यवान चिठ्ठी निवडण्यात आली. त्यात सौ. मंगल ताई शिंदे यांचा साडी, चोळी, ओटी व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
संगीतासाठी तबलावादक हरिभक्त परायण भास्कर महाराज अवचिते व गायक रमेश महाराज शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा पादुका प्रवास देवळाली प्रवरा ते श्रीरामपूर थत्ते ग्राउंड, खडका फाटा, समृद्धी पार्क, संभाजीनगर, मेहकर फाटा, अंजनी, कुकसा फाटा, गुंज या मार्गे झाला. गुंज येथे रेणुका मातेची पहिली पायरी व माहुरगड येथे भळंद गोंधळ सोहळ्याने समारोप झाला.
या धार्मिक यात्रेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश नवले, रोहित बंगाळ, भाऊसाहेब पटारे, सतीश पटारे आणि सर्व भाविकांनी परिश्रम घेतले.
आई जगदंबे मातेच्या आशीर्वादाने हा सोहळा भक्तिभावाने आणि आनंदात पार पडल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा