शीतल टाईम्स //- डॉ. नारायण मनोहर साठे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान ;अमेरिकेतून सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य सन्मान समारंभ संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
डॉ. नारायण मनोहर साठे यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान ;अमेरिकेतून सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य सन्मान समारंभ संपन्न
शीतल टाईम्स प्रतिनिधी
सामाजिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. नारायण मनोहर साठे यांना America International University, Hollywood (USA) यांच्यातर्फे Honorary Causa - Doctorate in Social Work ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.
६ जुलै २०२५ रोजी दिल्ली येथे एका भव्य सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
गेस्ट ऑफ ऑनर म्हणून अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामध्ये श्री बी. रामकृष्ण – भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत कार्य केलेले, श्री हरीशचंद्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सदस्य, श्री मनीष गावई, युवकल्याण मंत्रालयातील सरकारी अधिकारी, अँबे. डॉ. सनीपिना जयलक्ष्मी राव, आंतरराष्ट्रीय शांतता दूत, श्री प्रदीपकुमार शर्मा, हिंदुस्तान रिसर्च कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी, मा. ब्रह्माकुमारी दीदी, आध्यात्मिक विचारवंत, श्री राजीव मिश्रा – अध्यक्ष, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते.
पदवीप्रदान प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे, डॉ. साठे यांना त्यांच्या समाजहिताच्या कार्यासाठी आणि धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ही पदवी बहाल करण्यात आली आहे. डॉ. नारायण साठे यांचे कार्य हे केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोहोचले आहे, हे या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे.
कार्यक्रमात समाजसेवा, विज्ञान, उद्योजकता, युवा सशक्तीकरण आणि जागतिक शांतता क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारांमधून समाजहिताचे अनेक मुद्दे मांडले आणि युवकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर डॉ. सॅंग वॉन पार्क आणि रजिस्ट्रार मि. क्युंग बाई अन यांच्या स्वाक्षरीने हा सन्मान अधिकृत करण्यात आला आहे. "हा सन्मान माझा नाही, तर समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक सेवकाचा आहे," अशी नम्र प्रतिक्रिया डॉ. साठे यांनी व्यक्त केली आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा