शीतल टाईम्स // भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा; लाभक्षेत्रामध्ये समाधानाची लहर
शीतल टाइम्स प्रतिनिधी
भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा; लाभक्षेत्रामध्ये समाधानाची लहर
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत असलेल्या भंडारदरा व निळवंडे धरणांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाणी साठा झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अधिकृत अहवालानुसार, भंडारदरा धरणात ६८१२ mcft (61.74%) पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. तर, निळवंडे धरणात ४३२५ mcft (51.93%) इतका साठा आहे.
दोन्ही धरणांमध्ये मिळून एकूण १११३७ mcft पाणी साठा उपलब्ध आहे. पावसाळ्यात चांगल्या पर्जन्यमानामुळे धरणांची पातळी स्थिरपणे वाढत आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या मोसमात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने पाण्याचा योग्य वापर करण्याचे व पाणी नियोजनाचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत धरणांची पातळी आणखी वाढून १५ ऑगस्ट पुर्वीच धरण भरण्याची शक्यता आहे.
---
शीतल टाईम्स, श्रीरामपूर, अहिल्यानगर.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा