शीतल टाईम्स //-- चिरंजीव महेश दायमा यांचा चेन्नई येथे टॅलेंट पुरस्काराने सन्मान
शीतल टाइम्स प्रतिनिधी
चिरंजीव महेश दायमा यांचा चेन्नई येथे टॅलेंट पुरस्काराने सन्मान
बेलापूर (वार्ताहर): श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक गावचा सुपुत्र चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा चेन्नई येथे भरलेल्या कार्यक्रमात टॅलेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला. रविवार, दिनांक 20 जुलै 2025 रोजी हा सन्मान ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक यांच्या वतीने आयोजित वेदोत्सव सोहळ्यात देण्यात आला.
महेश दायमा यांनी 2024 साली आयोजित वेदोस्तव परीक्षेत 99% गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले होते. या परीक्षेमध्ये देशभरातील तब्बल 40 गुरुकुलांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात महेश यांनी पहिला क्रमांक मिळवत आपले ज्ञान व कौशल्य सिद्ध केले.
या यशाबद्दल त्यांचा कमल किशोरजी गुरुजी, जगदीशजी गुरुजी तसेच विविध मान्यवर पंडित आणि गुरूजनांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
महेश हे पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे आळंदी येथे पार पडलेल्या वेदोस्तव परीक्षेत देखील प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीत, अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते सुवर्ण मुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन गौरव करण्यात आले होते.
महेश दायमा यांचे प्राथमिक वैदिक शिक्षण राजस्थानातील गोठ मांगलोद (जि. नागौर) येथील गुरुकुलात झाले आहे. आता ते पुढील उच्च वैदिक शिक्षणासाठी काशीला प्रस्थान ठेवणार आहेत. त्यांच्या या यशामागे कमल किशोर जोशी गुरुजी, दधिमती गुरुकुल अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जयकिशन, संयुक्त सचिव रूप नारायण आसोपा, सुभाष मिश्रा तसेच सर्व शिक्षकवृंद आणि आईवडीलांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.
📸 शीतल टाईम्स विशेष:
वेदमूर्ती महेश दायमा याच्या या यशाने संपूर्ण बेलापूर गावाचे नाव उज्ज्वल झाले असून, गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा