शीतल टाईम्स //- सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बेलापूर ते हरिहर केशव गोविंद बन पायी दिंडी सोहळा संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बेलापूर ते हरिहर केशव गोविंद बन पायी दिंडी सोहळा संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुपतर्फे बेलापूर ते भगवान श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात व भजनांच्या सुरांनी सारा परिसर भक्तिमय झाला होता.
सकाळी सहा वाजता झेंडा चौकातून दिंडीची सुरुवात झाली. भगवतभक्तीत रंगलेल्या या दिंडीत कुमारी कृष्णगौरी किरण गागरे हिने पांडुरंगाची मूर्ती आपल्या डोक्यावर घेत भक्तिभावाने पुढे चालत जाणे विशेष आकर्षण ठरले. तिच्या मागे टाळ, मृदंग आणि भजनांचा ताल धरत अनेक भाविक सहभागी झाले होते.
मार्गात ठिकठिकाणी स्थानिक भाविकांनी दिंडीचे स्वागत करत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. भगवान श्री हरिहर केशव गोविंद बन येथे पोहोचल्यानंतर देवस्थानच्या वतीने दिंडीचे व सर्व वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या दिंडीमध्ये सत्यमेव जयते ग्रुपचे संजय भोंडगे दादा, अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, किरण गागरे, बाबासाहेब काळे, दीपकसा क्षत्रीय, विष्णुपंत डावरे, विलास नागले, किशोर दायमा, बाबूलाल पठाण, दिलीप अमोलिक, जाकीर शेख, राधेश्याम आंबीलवादे, महेश कुऱ्हे, सचिन कणसे, भगीरथ मुंडलीक, सुरेश सूर्यवंशी, पुंजाहरी सुपेकर गुरुजी, सचिन देवरे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सदस्य व भाविक सहभागी झाले होते.
भाविकांच्या उत्साहात पार पडलेला हा पायी दिंडी सोहळा भक्ती, एकता आणि संस्कृतीचे प्रतीक ठरला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा