शीतल टाईम्स // बेलापूर उपसरपंचपदी चंद्रकांत नवले (आबा) यांची बिनविरोध निवड: गावकरी मंडळाचे वर्चस्व कायम!

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर उपसरपंचपदी चंद्रकांत नवले (आबा) यांची बिनविरोध निवड: गावकरी मंडळाचे वर्चस्व कायम!



बेलापूर: तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा गावकरी मंडळाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आणि बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले (आबा) यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला असून, निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान विरोधी पक्षाचे नेते फिरकलेही नाहीत, हे विशेष.

चंद्रकांत नवले (आबा) यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आणून गावकरी मंडळाने पुन्हा एकदा आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे. यातून श्री. नवले आणि श्री. खंडागळे यांनी गावकरी मंडळ अभेद्य असल्याचा स्पष्ट संदेश विरोधकांना दिला आहे.

सर्वसमावेशक धोरणाचे दर्शन

गावकरी मंडळाने सरपंचपद आरक्षित असल्याने समाजातील इतर घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने उपसरपंचपदासाठी सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबले. याच धोरणांतर्गत श्री. चंद्रकांत नवले यांना उपसरपंचपदाची संधी देण्यात आली.
सरपंच मीना साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अभिषेक खंडागळे, स्वाती अमोलिक, मुश्ताक शेख, तबसुम बागवान, प्रियंका कु-हे, उज्वला कुताळ, वैभव कु-हे, सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक, भरत साळुंके यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. या अर्जावर अभिषेक खंडागळे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली, त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सरपंच मीना साळवी यांच्या बिनविरोध निवडीप्रमाणेच उपसरपंचपदाची ही निवडही बिनविरोध झाल्याने, शरद नवले, अभिषेक खंडागळे आणि प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडळाने ग्रामपंचायतीत आपले निर्विवाद राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, जनता विकास आघाडीचे सुधीर नवले आणि रविंद्र खटोड हे ग्रामपंचायतीकडे फिरकलेही नाहीत, तर भरत साळुंके वगळता इतर सदस्य अनुपस्थित होते.

विकास आणि एकजुटीचा संदेश

निवडीनंतर आयोजित आभार सभेत जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक, शांतीलाल हिरण आणि मोहसीन सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना शरद नवले म्हणाले की, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधी देण्याचा शब्द पाळला आहे, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी कनजीशेठ टाक, जालिंदर कुऱ्हे, राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण नाईक, रणजीत श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ, हाजी ईस्माईल शेख, विष्णुपंत डावरे, पुरुषोत्तम भराटे, सुधाकर तात्या खंडागळे, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक, ॲड. अरविंद साळवी, रावसाहेब अमोलिक, अन्वर सय्यद, शफिक बागवान, मोहसीन सय्यद, प्रभात कुऱ्हे, अभिषेक नवले, दिलीप दायमा, श्रीहरी बारहाते, दत्तात्रय नवले, सचिन अमोलिक, भैय्या शेख, बंटी शेलार, भाऊसाहेब तेलोरे, निसार बागवान, अशोक दुधाळ, शाहरुख शेख, व्दारकनाथ नवले, गोपी दाणी, राज गुडे, अजीज शेख, महेश कु-हे, रफीक शेख, सुभाष अमोलिक, बाबुराव पवार, शहानवाज सय्यद, विशाल आंबेकर, साहेबराव मोकाशी, जाकीर शेख, शरद अंबादास नवले, रफीक शेख, अशोक वहाडणे, दादासाहेब कुताळ, गणेश राशिनकर, विनायक जगताप, गोकुळ कुताळ, सागर खरात, शाम गायकवाड, शशिकांत नवले, दिपक गायकवाड, संजय गंगातिरवे, निसार आतार, अनिल नवले, शफिक आतार, राजेंद्र नवले, भरत नवले, दिपक प्रधान, पंढरीनाथ गाढे, शुभम नवले, अशोक दुधाळ, रंगनाथ नवले, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड, निलेश नवले, संजय नवले, राजेंद्र कुताळ, साईनाथ बागुल यांच्यासह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव