शीतल टाईम्स // सध्याच्या काळात मुलांसाठी संस्कार शिबिरांची गरज — मोहनकाका खानविलकर

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी


---

सध्याच्या काळात मुलांसाठी संस्कार शिबिरांची गरज — मोहनकाका खानविलकर


बेलापूर (वार्ताहर) — सध्याच्या मोबाईलच्या युगात मुलांवर योग्य संस्कार न झाल्याने त्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. मोबाईल, टीव्ही आणि सोशल मिडियाच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहनकाका खानविलकर यांनी केले.

येथील विठ्ठल मंदिरात सौ. कल्याणी काळे, श्री. राहुल डावरे आणि श्री. सखाराम मुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांचे विशेष बालसंस्कार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा समारोप समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सतिष भगत, सोपानबुवा हिरवे, डॉ. संपदा काळे, डॉ. माधव पगारे, डॉ. राशिनकर, निलेश हरिदास आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात मुलांना चित्र रंगवणे, हरिपाठ, स्तोत्र, भूपाळी, विविध आरत्या अशा अनेक उपक्रमांत सहभागी करून घेतले गेले. समारोपप्रसंगी सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. शिबिरासाठी विठ्ठल मंदिर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सोपानबुवा हिरवे यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या उपक्रमात शरद नवले, अभिषेक खंडागळे, आजिंक्य साळुंके, प्रशांत खरोटे, सुमती चालक, वैदेही डावरे, कृष्णा भागवत, ओमकार कोळपकर, विजय नागले, मुकुंद चिंतामणी, संतोष मवाणी, ओमकार मुळे, किशोर भगत, संतोष चिंतामणी, विजय मगर, रवी गवळी, साई भागवत यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी महत्त्वाचे सहकार्य केले.

या उपक्रमाचे ग्रामस्थ तसेच पालकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, भविष्यातही अशा शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव