शीतल टाईम्स //-बेलापूर-कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा पुन्हा प्रयत्न; चोरटे गॅस कटरसह फरार
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर-कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा पुन्हा प्रयत्न; चोरटे गॅस कटरसह फरार
बेलापूर (प्रतिनिधी): बेलापूर-कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला असून चोरटे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी कोल्हार चौकातील एटीएमला गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागदी पट्ट्या लावून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील या एटीएमवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे चोरटे फरार झाले होते.
![]() |
| सीसीटीव्ही मध्ये दिसणारी हीच ती कार |
कालच्या घटनेत देखील एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली असून कोणतीही हानी झाली नाही. चोरट्यांनी काही वेळा प्रयत्न केल्यानंतर एटीएम फोडण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून चारचाकी वाहनातून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा