शीतल टाईम्स //- अहिल्यानगर एमआयडीसीतील कामगार हॉस्पिटल आणि वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावणार — उद्योग मंत्री सावंत यांचे आश्वासन

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी


 अहिल्यानगर एमआयडीसीतील कामगार हॉस्पिटल आणि वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावणार — उद्योग मंत्री सावंत यांचे आश्वासन


अहिल्यानगर :
अहिल्यानगर एमआयडीसीमधील हजारो कामगारांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या कामगार हॉस्पिटलचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उद्योग मंत्री उदय सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

यावेळी मंत्री सावंत यांनी "लवकरच एमआयडीसीमध्ये कामगार हॉस्पिटलसाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देण्यात येईल," असे स्पष्ट आश्वासन दिले.

एमआयडीसी परिसरात हजारो कामगार कार्यरत आहेत. दर महिन्याला कामगारांच्या पगारातून तीनशे रुपये कट केले जात असताना देखील, त्यांना अद्याप पर्याय नसल्यामुळे आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी बाहेरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. एखाद्या अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार न मिळाल्याने जीवित हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

तसेच, एमआयडीसी परिसरात वाहनतळाची गरजही अधोरेखित करण्यात आली. बाहेरील राज्यांतून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना वाहनतळ उपलब्ध नसल्यामुळे मुख्य रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्या जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढते.

या दोन्ही मुद्द्यांवर उद्योग मंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

या बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, संपर्क मंत्री शंभूराजे देसाई, अभिषेक भोसले, अमोल हुंबे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाबुशेठ टायरवाले यांनी सांगितले की, "कामगार हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. त्यासाठी आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली ही सुविधा मिळवण्यासाठी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार आहे."




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव