शीतल टाईम्स //- 🌼 मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक दिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 🌼

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी 

---------------------------------------------

🌼 मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक दिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 🌼


अहिल्यादनगर (प्रतिनिधी):
महात्मा ज्योतिबा फुले यांनी मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केल्याच्या ऐतिहासिक दिवसानिमित्त, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनील सकट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

नगर-कल्याण रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुनील सकट, सरिता आष्टेकर, रंजना बर्वे, ऋतुजा नाट, वर्षा उबाळे, निकिता उबाळे, पूजा दातरंगे, गायत्री दातरंगे, आरती सकट, वंदना सकट आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना सुनील सकट म्हणाले, "दि. ३ जुलै १८५२ रोजी महात्मा फुले यांनी मागासवर्गीय समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरू करून शैक्षणिक क्रांतीचा पाया घातला. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करत समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून वंचितांना नवा आत्मविश्वास व शिक्षणाची संधी मिळाली. समाजातील विषमतेविरुद्ध लढा देत त्यांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांचे कार्य संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ आहे."

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला.
---

महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सुनील सकट व विद्यार्थी. (अहिल्यादनगर)

-------------------------------------------



********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव