शीतल टाईम्स //-शाळकरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



शाळकरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम

श्रीरामपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारी वस्ती येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. हा उपक्रम अपंग सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने राबविण्यात आला.

संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साधनांचा वापर होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो."

दरवर्षी संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याची परंपरा अध्यापिका वर्षा गायकवाड यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याची गोडी वाढते आणि शिक्षणात सातत्य टिकते.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षदा पुजारी, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, अंगणवाडी सेविका रेखा पुजारी, श्रीमती झुंबर पुजारी काकू, सौ. सविता पुजारी, सौ. वैशाली पुजारी, कु. सायली पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचे बेलापूर खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रणाली भगत यांनी विशेष कौतुक केले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक गाढे व पालक श्री. गणेश जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कु. भाग्यश्री वाबळे यांनी तर आभार प्रदर्शन मृणालिनी क्षीरसागर यांनी केले.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव