शीतल टाईम्स. // रेणुका देवी पादुका व शक्तिदंड यात्रा ९ जुलैपासून; भक्तांना भावनिक आवाहन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
रेणुका देवी पादुका व शक्तिदंड यात्रा ९ जुलैपासून; भक्तांना भावनिक आवाहन
बेलापूर (वार्ताहर) — देवळाली प्रवरा येथून माहूरगड पर्यंत रेणुका देवी पादुका व शक्तिदंड यात्रा दिनांक ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता नवदुर्गा काच मंदिर, श्रीरामपूर येथून देवीभक्त केशव गुरु दिमोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे.
यात्रेच्या प्रारंभापूर्वी नवदुर्गा काच मंदिरात पहाटे आरती होणार असून, त्यानंतर भाविक मोठ्या भक्तिभावाने माहूरगडकडे प्रस्थान करणार आहेत. मार्गामध्ये खडका फाटा, संभाजीनगर, मेहकर, कुकसा, वाशिम अशा विविध ठिकाणी पादुकांचे पूजन करण्यात येईल.
सायंकाळी माहूरगड येथे दत्त दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढे, दिनांक १० जुलै रोजी सकाळी ६ वाजता मातृतीर्थ स्नान, पादुका व शक्तिदंड पूजन तसेच भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यात्रेनंतर रेणुका माताजींचे दर्शन, अभिषेक, हळद गोंधळ, महाआरती व महारती होईल. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेणुका देवी सत्संग मंडळ, देवळाली प्रवरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा