शीतल टाईम्स //- स्व. अविनाश अरुण शेलार यांची दशक्रिया विधी बुधवार, २३ जुलै रोजी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
स्व. अविनाश अरुण शेलार यांची दशक्रिया विधी बुधवार, २३ जुलै रोजी
बेलापूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी) – मूळचे बेलापूर येथील रहिवासी असलेले आणि कामानिमित्त अहिल्यानगर येथे वास्तव्यास असलेले अविनाश अरुण शेलार (वय ३५) यांचे दि. १४ जुलै २०२५ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडील, दोन बहिणी, मेहुणे, भाचे व इतर आप्तेष्ट असा परिवार आहे. अविनाश हे अहिल्यानगर येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. अत्यंत शांत, मनमिळावू व कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे त्यांचा समाजात आणि कुटुंबात विशेष सन्मान होता.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. नावघाट, बेलापूर बुद्रुक, प्रवरा नदी तीरावर होणार आहे.
या शोकप्रसंगी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व गावकरी यांनी विधीस्थळी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती शेलार कुटुंबीयांनी केले आहे.
शोकाकुल – अरुण योसेफ शेलार व समस्त शेलार परिवार, बेलापूर बुद्रुक.
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा