शीतल टाईम्स // - बेलापूर येथे आषाढी एकादशी निमित्त महाआरती व प्रसाद वाटप

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर येथे आषाढी एकादशी निमित्त महाआरती व प्रसाद वाटप

बेलापूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी) — बेलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात भव्य महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम ह.भ.प. सोपान महाराज हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले आणि माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आला होता.

या वेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठलाची महाआरती पार पडली. महाआरतीनंतर सर्व उपस्थित भक्तांना खिचडी व राजगिरा लाडूचा प्रसाद वाटण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपक क्षत्रिय यांच्या प्रवचनाने झाली. यानंतर ह.भ.प. बबन महाराज अनाप, ह.भ.प. अशोक महाराज शिरसाठ, विलास नाना मेहत्रे व किरण महाराज गागरे यांनी भक्तिगीत व भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. पौरोहित्य हरिहर काळे गुरु व बापू गुरु देवकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य प्रतिष्ठान व महिला मंच, हरिहर शेजआरती मंडळ, सत्यमेव जयते ग्रुप, साई क्लासेस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी ह.भ.प. सोपान महाराज हिरवे, बबन महाराज अनाप, अशोक महाराज शिरसाठ, किरण महाराज गागरे, विलास नाना मेहत्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, बेलापूर पोलीस औट पोस्टचे संपत बडे, नंदकिशोर लोखंडे, आदिनाथ आंधळे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, तसेच जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ, भास्कर खंडागळे, कनजीशेठ टाक, सुधाकर तात्या खंडागळे, दिलीप काळे, पुरुषोत्तम भराटे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दिपक क्षत्रिय, सुहास शेलार, रमेश दायमा, सुभाष सोमाणी, सुरेश बाबुराव कुऱ्हे, महेशजी जेठवा, गोविंद श्रीगोड, डॉ. सुधीर काळे, लक्ष्मणराव मुंडलिक, बाबासाहेब काळे, सोमनाथ लगे, सोमनाथ साळुंके, राधेश्याम अंबिलवादे, दिलीप अमोलिक, साहेबराव मोकाशी, दयानंद शेंडगे सर, डॉ. रवींद्र गंगवाल, भरत सोमाणी, रावसाहेब कुऱ्हे, अशोक दुधाळ, रमेश काळे, बबन मेहत्रे, प्रभाकर ताके, राहुल लखोटिया, प्रशांत मुंडलिक, हेमंत मुंडलिक, सुभाष बोरा, बबलू बनभेरू, देविदास घाणे, जनार्दन ओहोळ, सतीश काळे, संजय भोंडगे, दिपक काळे, अरुण कुलकर्णी, अरुण काळे, ओमप्रकाश व्यास, लक्ष्मण राशिनकर, गणपत साळुंके, प्रभात कुऱ्हे, बाबुराव पवार, अँड. अरविंद साळवी, सचिन अमोलिक, प्रसाद कुलकर्णी, संजय खंडागळे, किरण बैरागी, विठ्ठल शिंदे, अनिल कुऱ्हे, राजेश सूर्यवंशी, भगीरथ मुंडलिक, किरण खराडे, उपेंद्र कुलकर्णी, सागर ढवळे, मुकुंद चिंतामणी, प्रमोद पोपळघट, ऋतुराज वाघ, करण गोसावी, नितीन शर्मा, श्रीहरी बारहाते, तुकाराम जाधव, चंद्रकांत ताथेड, नंदकिशोर दायमा, मधुकर अनाप, विजय कोठारी, राहुल माळी, मधुकर ठोंबरे, नाना चिंतामणी, पोपट पवार, विनायक जगताप, जितेंद्र वर्मा, विजय दरक, विशाल आंबेकर, महेश कुऱ्हे, गोपी दाणी, सचिन देवरे, गणेश कोळपकर, मच्छिंद्र नागले, शरद पुजारी, यश पवार, केशव शिंदे, मयुर मोरे, राज गुडे, संतोष ताथेड, प्रशांत दायमा, विकी पगारे, मारुती गायकवाड, महंत काळे, दादासाहेब कुताळ, सचिन मेहेत्रे, सोमनाथ शिरसाठ, राजेंद्र काळे, शाम मेहेत्रे, सचिन वाबळे, संजय जगताप, सूरज भुसा, हरीष बडाख, बाळासाहेब जाधव, सुजित सहानी, नारायण मुंडलिक, किशोर खरोटे, अर्जुन कुऱ्हे, राहुल माळवदे, अक्षय पवार, योगेश नागले, सचिन राकेचा आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकरी मंडळ आणि सर्व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव