शीतल टाईम्स //- बेलापूरातील गोमांस सापडलेली वादग्रस्त बेकरी अखेर ग्रामपंचायतीच्या कारवाईनंतर हटवली!

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूरातील गोमांस सापडलेली वादग्रस्त बेकरी अखेर ग्रामपंचायतीच्या कारवाईनंतर हटवली!

बेलापूर (प्रतिनिधी) — येथील उर्दू शाळेच्या मागील जागेतील बेकरीमध्ये गोमांस आढळल्याने गावात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणावर अखेर पडदा पडला आहे. ग्रामपंचायतीच्या नोटिशीनंतर संबंधित बेकरी मालकाने स्वतःहून बेकरी काढून टाकली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, काही दिवसांपूर्वी बेलापूर येथील उर्दू शाळेच्या मागील जागेतील एका बेकरीत गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटना व व्यापारी संघटनांनी बेकरी बंद करण्याची जोरदार मागणी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाकडे केली होती.

त्यानुसार, ग्रामपंचायतीने पोलिस प्रशासनाच्या मदतीने तातडीने कारवाई करत बेकरीमधील गोमांस विक्रीचे शेड काढून टाकले. तसेच बेकरीच्या परवान्याची कागदपत्रे तीन दिवसांत सादर करण्याची नोटीस बेकरी मालकास देण्यात आली होती. तथापि, दिलेल्या मुदतीत कोणतेही पुरावे सादर न केल्याने ग्रामपंचायतीने अंतिम नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला.

अखेर, या नोटिशीनंतर बेकरी मालकाने सदर बेकरी काढून टाकण्याचा निर्णय घेतला.  यातून गोमांस विक्री करण्यासाठी आपल्या व्यवसायाच्या किंवा घराच्या आडोशाला जाणीवपूर्वक जागा उपलब्ध करून देणाऱ्यांनी बोध घ्यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गोमांस विक्रीच्या या प्रकरणामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मिना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे, बेलापूर पोलीस औट पोस्टचे संपत बडे, बाळासाहेब कोळपे, भारत तमनर व नंदकिशोर लोखंडे यांनी मिळून अतिशय संयमाने आणि योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली.

त्यामुळे या संवेदनशील प्रकरणावर अखेरीस शांततेच्या मार्गाने पडदा पडला असून गावात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव