शीतल टाईम्स //- शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे झेंडा चौकात भव्य स्वागत
शीतल टाईम्स प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे झेंडा चौकात भव्य स्वागत
बेलापूर (प्रतिनिधी) – बेलापूर शहरातील झेंडा चौक येथे आज सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
आषाढी एकदशी निमित्त बेलापूर येथील जे.टी.एस. हायस्कूल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलापूर, श्री. साई. इंग्लिश मेडीयम स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले-मुली), ए प्लस स्कुल यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या दिंडीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व भगवे झेंडे घेऊन वारकऱ्यांच्या वेशभूषेत फेरी काढली. मुलींनी पारंपरिक साडी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग दर्शवला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी फड, भजने व विठ्ठल नामजप करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. घोड्यावर बसलेले वारकरी व सजवलेली पालखी सर्वांचे आकर्षण ठरली.
दिंडी सोहळ्याचे झेंडा चौकात गावातील पुढारी, शिक्षक, पालक, पोलीस, पत्रकार तसेच नागरिकांनी वाजतगाजत स्वागत केले. प्रमुख मान्यवर म्हणून गावातील कर्ती व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची व पारंपरिक संस्कृतीची जपणूक करण्याचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा