शीतल टाईम्स //- बेलापूर सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पुढील शिक्षणासाठी प्रेरणा

      

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पुढील शिक्षणासाठी प्रेरणा

बेलापूर (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा योग्य मार्ग निवडून मेहनत करण्याचे आणि मोठे अधिकारी बनून पालक, गाव तसेच स्वतःचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केले.

बेलापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था बेलापूर यांच्या वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र सातभाई होते.

राजेंद्र सातभाई म्हणाले, "गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक असून, मुलांनीही मुलींच्या बरोबरीने अभ्यास करून आई-वडिलांचे नाव मोठे करावे. गुणवत्तेमुळे विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी ठरू शकतो."

या कार्यक्रमात बेलापूरच्या जे. टी. एस. हायस्कूल व महाविद्यालय, केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द आणि वाघोजी रामजी पाटील विद्यालय बेलापूर खुर्द येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दत्ता कुऱ्हे, चंद्रकांत नाईक, शेषराव पवार, पत्रकार देविदास देसाई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाला संस्थेचे व्हा. चेअरमन सविताताई मेहेत्रे, संचालक पंडीतराव बोंबले, शिवाजी पा. वाबळे, नंदकिशोर नवले, अशोक कुऱ्हे, सुधाकर खंडागळे, काशिनाथ गाढे, भास्करराव वाबळे, अंतोन अमोलीक, भरत नवले, दत्तात्रय कुऱ्हे, सदाशिव मेहेत्रे, अनिल पाटील नाईक, वसंतराव शिंदे, तुकाराम मेहेत्रे, प्रकाश कुऱ्हे, पत्रकार ज्ञानेश्वर गवले, भिकाजी मेहेत्रे, महेश नवले, पांडुरंग कुऱ्हे, विजय खंडागळे, महेश मेहेत्रे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विजय खंडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जालिंदर गाढे यांनी केले.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव