शीतल टाईम्स //-गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच यश मिळाले – वेदमूर्ती महेश दायमा वेदोत्सव परीक्षेत प्राविण्य; पुढील शिक्षणासाठी काशीला प्रयाण

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच यश मिळाले – वेदमूर्ती महेश दायमा

वेदोत्सव परीक्षेत प्राविण्य; पुढील शिक्षणासाठी काशीला प्रयाण

बेलापूर (प्रतिनिधी)"जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या आशीर्वादामुळेच मला वेदमूर्ती पदवी प्राप्त झाली आहे," असे प्रतिपादन वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांनी केले.

राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील गोठ मांगलोद येथे वेद शिक्षण घेतलेल्या महेश दायमा यांनी तेथील गुरु अभिवादन कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. "राममंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज, तसेच आळंदी आणि गोठ मांगलोद गुरुकुलातील माझ्या गुरूजनांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांनीच मला वेदांचे धडे दिले आणि या पदवीपर्यंत पोहोचवले," असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात कमल किशोर जोशी, जगजीतजी गुरुजी, दधिमती गुरुकुलचे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जयकिशन, संचालक भालचंद्र व्यास, रुपनारायण असोपा, सुभाष मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

वेदमूर्ती महेश दायमा यांना चेन्नई येथील ओम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित वेदोत्सव परीक्षात प्राविण्य मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले आहे.

महेश हा बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा व सौ. मिनाताई दायमा यांचा सुपुत्र असून तो पुढील उच्च शिक्षणासाठी काशी (वाराणसी) येथे जाणार आहे. त्याच्या या यशाबद्दल आचार्य महेश व्यास, सतिश व्यास (अहिल्यानगर), ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, बाळासाहेब आगे, बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे तसेच रणजित श्रीगोड, अशोक गाडेकर, सुनील मुथा, देविदास देसाई, नवनाथ कुताळ, ज्ञानेश्वर गव्हले, विष्णुपंत डावरे, सुनील नवले, सुहास शेलार, दीपक क्षत्रिय, अतिश देसर्डा, शरद पुजारी, गोविंद साळुंके यांसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव