शीतल टाईम्स //- बेलापूर ग्रामपंचायतीकडून ओला व सुका कचऱ्याचे स्वतंत्र वर्गीकरण करून संकलनास सुरुवात

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर ग्रामपंचायतीकडून ओला व सुका कचऱ्याचे स्वतंत्र वर्गीकरण करून संकलनास सुरुवात

बेलापूर (प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बु. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा’च्या सहकार्याने गावातील ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलन करण्याच्या उपक्रमास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत सरपंच सौ. मिनाताई साळवी व उपसरपंच श्री. चंद्रकांत नवले यांनी माहिती दिली की, नजीकच्या काळात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येणार असून, या माध्यमातून गावात सेंद्रिय खतनिर्मितीचा मार्ग खुला होणार आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे स्वतंत्र संकलन करण्याचा उपक्रम श्री. शरद नवले व श्री. अभिषेक खंडागळे यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आला आहे. यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, ग्रामस्थांनाही ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘प्रारंभ’ संस्थेचे श्री. शशिकांत दुशिंग व सौ. अनिता पाचपिंड हे घरोघरी जाऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करत असून, ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही त्यांना सहकार्य करत आहेत.

या उपक्रमाला ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, नागरिक ओला कचरा (फळे, भाजीपाल्यांच्या साली, देठ, पालापाचोळा, अन्नखरकटे, खराब अन्न इ.) व सुका कचरा (प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, कागद, पुठ्ठे, कापडाच्या चिंध्या, औषधांचे रॅपर्स, प्लास्टिक अवशेष इ.) स्वतंत्रपणे वर्गीकृत करून कचरागाडीत ठेवत आहेत.

नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीस मोफत उपलब्ध करून दिलेल्या जागेवर लवकरच डम्पिंग यार्ड उभारण्यात येणार असून, याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सौ. साळवी व उपसरपंच श्री. नवले यांनी दिली.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव