शीतल टाईम्स //- बेलापूरात पोलीस दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे; अनाथाश्रमासाठी ४८०० रुपयांची मदत

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी


बेलापूरात पोलीस दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे; अनाथाश्रमासाठी ४८०० रुपयांची मदत


बेलापूर (प्रतिनिधी) – गावाचे रक्षण करणारे पोलीस हे दादाच असून, अडीअडचणीला भावाप्रमाणे धावून येतात. समाजकंटकांपासून गावाचे रक्षण करण्याचे त्यांचे कार्य मोठे असल्याने, रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून बेलापूरात अव्याहतपणे सुरू आहे. हा उपक्रम पत्रकार देविदास देसाई यांच्या पुढाकारातून पार पडतो.

याच परंपरेनुसार यावर्षीही बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, संपत बडे, नंदकिशोर लोखंडे, किरण शेलार, पंकज सानप, रवि अभंग यांना महिलांनी राखी बांधून औक्षण केले.

कार्यक्रमाला सरपंच सौ. मीनाताई साळवी, माजी सरपंच सौ. ज्योतीताई भांड, सौ. प्रतिभा देसाई, सौ. संगीता देसाई, सौ. कल्पना शिंदे, सौ. राजश्री अमोलिक, सौ. रत्नमाला डावरे उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी पोलीस दादांबरोबरच ग्रामस्थांनाही औक्षण करून राखी बांधली.

विशेष म्हणजे, ओवाळणी स्वरूपात पोलीस दादांकडून २५०० रुपये व ग्रामस्थांकडून २३०० रुपये अशी एकूण ४८०० रुपयांची रक्कम बेलापूर येथील अनाथाश्रमाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामाजिक भावनेचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमात जि.प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, पत्रकार विष्णुपंत डावरे, सेवानिवृत्त पीएसआय संजय भोंडगे दादा, दीपक क्षत्रीय यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर आभार पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी मानले. कार्यक्रमाला एड. अरविंद साळवी, दिलीप अमोलिक, पत्रकार असलम बिनसाद, पत्रकार दिलीप दायमा, राधेश्याम अंबिलवादे, एजाज सय्यद, पुंजाहरी सुपेकर, सचिन कणसे, बाबूलाल पठाण, महेश कुऱ्हे, विलास नागले, औदुंबर राऊत, नितीन शर्मा यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव