शीतल टाईम्स //-प्रवरा नदीवरील विज मोटार व केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
प्रवरा नदीवरील विज मोटार व केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील प्रवरा नदीवर शेतकऱ्यांनी बसविलेल्या विज मोटार व केबल चोरीच्या घटनांनी उग्र रूप धारण केले असून, या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, कडीत येथील ग्रामस्थांनी कोल्हार पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी प्रवरा नदीवर बसविलेल्या विज मोटार व केबलच्या चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या अशाच घटनेबाबत तक्रार नोंदवली नसल्याचा फायदा घेत, चोरट्यांनी पुन्हा मोटार व केबल चोरून नेल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी कुरणपूर परिसरातही अशाच प्रकारे केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
चोरटे चारचाकी वाहनातून येऊन केबल व मोटार चोरी करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पावसाने आधीच शेतीवर विपरीत परिणाम केला असताना, या चोरीमुळे शेतकऱ्यांची हतबलता आणखी वाढली आहे.
या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून अशा घटना रोखाव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनावर भाऊसाहेब वडीतके, जगन्नाथ चितळकर, शहाजी वडीतके, नंदकुमार चितळकर, उद्धव जोशी, अण्णासाहेब गेठे, बाबासाहेब चितळकर, मुनीर पिंजारी, बबनराव वडीतके, नरेंद्र जोशी, मच्छिंद्र तांबे, संदीप चितळकर, संपत चितळकर, सुधाकर जोशी, सोन्याबापू वडीतके आदींच्या सह्या आहेत.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा