शीतल टाईम्स //-भागवत प्रतिष्ठानचा मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिर उपक्रम स्तुत्य - धनश्रीताई विखे

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी


भागवत प्रतिष्ठानचा मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिर उपक्रम स्तुत्य - धनश्रीताई विखे

बेलापूर (प्रतिनिधी) भागवत प्रतिष्ठान, स्वस्तिक ग्रुप, बुधराणी हॉस्पिटल व डॉ. काळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिराने शतक पार केल्याने समाजकारणाची प्रेरणा आणि गरजूंची सेवा घडते, असे प्रतिपादन सौ. धनश्री सुजयदादा विखे पाटील यांनी केले.

हा १०१ वा मोफत शिबिर उपक्रम सौ. धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. शरद नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला बेलापूर बु.च्या सरपंच मिनाताई साळवी, बेलापूर खुर्दच्या सरपंच सविताताई राजुळे, स्नेहल नवले, मानवी खंडागळे, प्रियंका कु-हे, तबस्सुम बागवान, सुशिलाबाई पवार, डॉ. संपदा काळे, सौ. कल्याणी काळे, प्रफुल्ल डावरे, रणजित श्रीगोड, भाऊसाहेब कुताळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. विखे पाटील म्हणाल्या की, “राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असल्याचा संस्कार विखे कुटुंबावर आहे. त्याच मार्गाने भागवत प्रतिष्ठान कार्यरत आहे. आपली मुले मोठ्या शहरात किंवा परदेशी जाण्याऐवजी गावासाठी सामाजिक कार्य करणे आवश्यक आहे.”

अध्यक्षीय भाषणात श्री. शरद नवले यांनी सांगितले की, पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. सुजयदादा व सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाची कामे वेगाने होत आहेत. जलजीवन योजनेअंतर्गत नळजोडणी पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे टप्याटप्याने पूर्ण केली जातील. काहीजण अडथळे आणत असले तरी विकासाचा वेग कायम राहील.

प्रास्ताविकात भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी माहिती दिली की, सन २०१६ पासून सुरु असलेल्या या उपक्रमात आजवर ४ हजार रुग्णांची तपासणी व २८०० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूर–ऐनतपूरसाठी १३६ कोटींची पाणी पुरवठा योजना, साठवण तलावासाठी ८.५ एकर, ११०० घरकुलांसह ३४ एकर नागरी सुविधा विकासासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बुधराणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे, मनीषा कोरडे, डॉ. सुधीर काळे, डॉ. संपदा काळे आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर आभार सुधाकर तात्या खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमास स्वस्तिक ग्रुप, सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य, गावकरी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, पेशंट व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव