शीतल टाईम्स //- छत्रपती तरुण मंडळतर्फे ‘आंधळी दहिहांडी’ व श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
छत्रपती तरुण मंडळतर्फे ‘आंधळी दहिहांडी’ व श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा
बेलापूर शीतल टाईम्स
गोकुळाष्टमी आणि गोपालकाला उत्सवानिमित्त छत्रपती तरुण मंडळ, बेलापूर यांच्या वतीने आज (शनिवार) सायं. ५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, नगर रोड येथे आंधळी दहिहांडी आणि श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
हरगोविंदा एंटरप्रायजेस प्रायोजित आंधळी दहिहांडी स्पर्धेत खुल्या गटासाठी रु. २१०० चे पारितोषिक तर ५वी ते ७वीतील मुलांच्या गटासाठी प्रत्येकी रु. ५०० ची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
बाल श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धेसाठी—
प्रथम पारितोषिक : रु. ११००
द्वितीय पारितोषिक : रु. ७००
तृतीय पारितोषिक : रु. ५००
इच्छुकांनी आपली नावे ओंकार साळुंके यांच्याकडे नोंदवावीत, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा