शीतल टाइम्स //-बेलापूरला संतश्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरला संतश्री ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी):
श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव तसेच दीपोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेला बेलापूर-ऐनतपूर पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे भाविक, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात शोभायात्रा गावातून निघाली. भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आकर्षक रिंगण केले तर काहींनी फुगडी खेळत उत्सवाचा आनंद लुटला.
शोभायात्रा विजयस्तंभ चौकात पोहोचताच मान्यवरांनी तिचे स्वागत केले. यात्रेच्या मार्गावर महिला भगिनींनी रांगोळ्यांनी सजावट केली होती.
शोभायात्रेनंतर दीपोत्सव सोहळा पार पडला. महिला भक्तींनी दीपज्योतीसह सहभागी होत वातावरण अधिकच मंगलमय केले. दीपोत्सवामुळे केशव-गोविंद परिसर उजळून निघाला.
या यशस्वी सोहळ्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाने परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा