शीतल टाइम्स //-पत्रकार बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी; पत्रकारांचा निषेध, आरोपीवर कारवाईची मागणी

 


शीतल टाइम्स प्रतिनिधी

पत्रकार बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी

बेलापूर पत्रकारांकडून निषेध

आरोपीवर कारवाईची मागणी

बेलापूर (प्रतिनिधी) 

श्रीरामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांनी वृत्तपत्रात नशिले पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पडदा फाश करणारी बातमी प्रकाशित केली. या वृत्ताचा राग मनात धरून  त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा बेलापूरसह परिसरातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या संदर्भात पत्रकारांनी बेलापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मारोतराव राशिनकर म्हणाले की, “पत्रकार हे समाजाचा आरसा असून वाईट कृत्य उघड करण्याचे कार्य ते करतात. बाळासाहेब आगे गेली ४० वर्षे निपक्षपाती पत्रकारिता करत आहेत. अशा पत्रकाराला धमक्या देणे म्हणजे पत्रकारितेची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. अशा गुंडांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.”

पत्रकारांच्या निवेदनानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांनी सांगितले की, आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक केली जाईल.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, रणजीत श्रीगोड यांनीही मनोगत व्यक्त करून पत्रकारांच्या सुरक्षेची मागणी केली. कार्यक्रमाला मारुती राशिनकर, प्रा. ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ, दिलीप दायमा, सुहास शेलार, अशोक शेलार,  दीपक क्षत्रिय, भरत थोरात, शरद थोरात, एजाज सय्यद, रफिक शेख, महेश ओहोळ, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात आदींसह पोलिस हवालदार बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर, पंकज सानप उपस्थित होते.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव