शीतल टाईम्स /- केशव-गोविंद सप्ताहात सोमवार, ४ ऑगस्ट रोजी भास्करगिरी महाराजांचे किर्तन भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
शीतल टाइम्स प्रतिनिधी
केशव-गोविंद सप्ताहात सोमवार, ४ ऑगस्ट रोजी भास्करगिरी महाराजांचे किर्तन
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बेलापूर (शीतल टाईम्स वृत्तसेवा) – बेलापूर येथे सध्या सुरू असलेल्या श्री हरिहर केशव-गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा सोहळ्यांतर्गत सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता देवगड येथील श्रीदत्त देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
श्रावण महिन्यानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यात विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर आणि ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या श्रीमद भागवत कथेचे प्रवचनही दररोज भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडत आहे. बेलापूर पंचक्रोशीतील विविध गावांतील भक्त या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे हजेरी लावत आहेत.
या ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने भास्करगिरी महाराजांची विशेष सदिच्छा भेट आणि कीर्तन होणार असून, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सप्ताह समिती, शेजआरती मंडळ, हरिहर भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ आदी संस्थांतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा