शीतल टाईम्स //- भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपतर्फे १०१ वे नेत्रतपासणी शिबिर सौ. धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन

       

शीतल टाइम्स प्रतिनिधी




भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपतर्फे १०१ वे नेत्रतपासणी शिबिर

सौ. धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन

बेलापूर (प्रतिनिधी) – भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने, पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल आणि बेलापूर येथील डॉ. काळे हॉस्पिटलच्या सहकार्याने बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी १०१ व्या मोफत मोतिबिंदू व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन सौ. धनश्री सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि.प. सदस्य शरद नवले भूषवणार आहेत. सरपंच मिनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, भाजपचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती अमोलिक, मुश्ताक शेख, तबस्सुम बागवान, प्रियांका कुहे, उज्वला कुताळ, सुशिलाबाई पवार, वैभव कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ पासून दरवर्षी मोफत मोतिबिंदू तपासणी, नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया व उपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. या उपक्रमाने नुकतेच शतक पूर्ण केले असून, येणारे शिबिर हा १०१ वा टप्पा ठरणार आहे.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे (मो. ९८९०५६३६३३) किंवा डॉ. सुधीर काळे (मो. ९४२३७८६१२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव